Join us  

'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 1:09 PM

नुकतीच प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नुकतीच प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला. 

प्राजक्ता माळी ही सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करते आहे. या शोची संपूर्ण टीम वर्षा बंगल्यावर गेली होती. त्यावेळी प्राजक्तासह इतर कलाकारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ‘ग्रेट भेट! काल माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. तिही ‘वर्षा’वर. काल साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. धन्यावाद मुळे काका. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब; व्यस्त वेळापत्रकातून सबंध १ तास आम्हाला दिल्याबद्दल, मनापासून कौतुक करून उत्साह वाढविल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद’.या कॅप्शनमध्ये प्राजक्ता माळीने हॅशटॅग ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ असे लिहिले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांच्या ‘माझा पुरस्कार’साठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांची निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा बंगल्यावर करण्यात आले. यावेळी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर हजर होते. उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचे कौतुक देखील केले. 

टॅग्स :प्राजक्ता माळीउद्धव ठाकरेमहाराष्ट्राची हास्य जत्रा