Join us

"निर्माता म्हणून पदार्पण करतोय...", १६ वर्षांच्या अभिनयातील प्रवासानंतर 'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याची नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:10 IST

१६ वर्ष अभिनय केल्यानंतर आता योगेश निर्मितीची बाजूही सांभाळणार आहे. निर्माता झाल्यानंतर योगेशने पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. 

अभिनयासोबत निर्मिती, दिग्दर्शन, लेखन करणारे अनेक कलाकार आहे. काही वर्ष इंडस्ट्रीत करिअर केल्यानंतर अनेकांनी अभिनयासोबतच वेगळ्या वाटा निवडल्या. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. हा अभिनेता म्हणजे योगेश सोहोनी. १६ वर्ष अभिनय केल्यानंतर आता योगेश निर्मितीची बाजूही सांभाळणार आहे. निर्माता झाल्यानंतर योगेशने पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. 

Unsolved या वेब सीरिजची योगेश निर्मिती करणार आहे. या वेब सीरिजचं लेखन जुई गडकरी करत आहे. Cocktail Studio Pvt Ltd ही निर्मिती कंपनी योगेशने सुरू केली आहे. तो म्हणतो, "एक आनंदाची बातमी.....निर्माता म्हणून पदार्पण करतोय ! खरं तर सह दिग्दर्शक म्हणून मी या कलेच्या क्षेत्रात कामाची सुरवात केली. ६ महिने काम केल्यावर ११ सप्टेंबर २००९ साली मी पहिल्यांदा प्रोफेशनल अभिनेता म्हणून मालिकेत काम केले. त्यानंतर मजल दर मजल करत अनेक मराठी-हिंदी मालिका (मुख्य आणि सहाय्यक भूमिका) तसंच काही निवडक चित्रपट, मोजकेच पण कायम लक्षात राहतील अश्या दिग्गज व्यक्तींबरोबर निवेदनाचे कार्यक्रम केले".  

"Book My Show मधील 2 वर्ष केलेली नोकरी, काही Advertisement साठी केलेला अभिनय आणि Executive Producer म्हणून केलेले काम, काही गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन या अश्या कामांचा 16 वर्षांचा लहानसा अनुभव गाठीशी घेऊन निर्मिती च्या पर्वाला आजच्या चांगल्या दिवशी सुरवात करतोय. या अनेक वर्षात असंख्य चांगले-वाईट अनुभव आले खूप माणसं जोडली गेली काही लांब गेली तर जे माझ्यासोबत होते, आहेत आणि असतील त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि जे सोबत नाहीयेत त्यांचेही आभार कारण त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या", असं त्याने पुढे म्हटलं आहे. 

योगेश म्हणतो, "खरं तर तशी या निर्मिती प्रवासाची सुरवात लहान-सहान गोष्टी करून 2 वर्षांपूर्वीच झाली होती. पण तेव्हा आमची Cocktail Studio ही LLP फर्म होती. पण आता COCKTAIL STUDIO PVT LTD Company केल्यावर हे आमचं पहिलं प्रोजेक्ट आणि ते सुद्धा Z5 सारख्या मोठ्या OTT Platform साठी. आत्तापर्यंत तुम्ही मला जसं प्रेम, आशिर्वाद माझ्या अभिनयातील कामासाठी, भूमिकांसाठी देत आलात तसंच या पुढेही माझ्या या नवीन प्रवासाला द्याल अशी आशा आहे. माझ्या (मी अभिनय केलेल्या) २ आगामी चित्रपटा बद्दल सुद्धा लवकरच तुम्हाला माहिती मिळेल, तसंच आणखीन खूप नवीन नवीन Projects आपल्या Cocktail Studio Pvt Ltd या Company चे येणार आहेत, त्याचे वेळोवेळी Updates मी देत राहीनच".  

English
हिंदी सारांश
Web Title : Yogesh Sohoni: From Actor to Producer After 16 Years

Web Summary : Actor Yogesh Sohoni embarks on a new journey as a producer after 16 years in acting. He's launching Cocktail Studio Pvt Ltd and producing the web series 'Unsolved,' written by Jui Gadkari, for a major OTT platform. Sohoni expresses gratitude for his journey and seeks support for his new venture.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता