स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' (mulagi jhali ho) या मालिकेतून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगांवकर (divya pugavkar). या मालिकेत दिव्याने माऊ ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिने साकारलेल्या मूक भुमिकेचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक झालं. मालिकेत एकही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी दिव्या लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच 'मुलगी झाली हो' या गाजलेल्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी दिव्या आता पुन्हा कधी दिसणार हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. मात्र, या मालिकेनंतर दिव्या आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
दिव्या लवकरच 'मन धागा धागा जोडते' नवा या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता तिला नव्या रुपात पाहण्यााठी चाहते आतुर झाले आहेत.