Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लिटिल चॅम्प’मधील मुग्धा वैश्यंपायन आठवते का? आता दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:00 IST

२००८ साली आलेल्या  लिटिल चॅम्सनी या रियालिटी शोने एक से बढकर एक स्पर्धकांमुळे रसिकांचे भरघोस मनोरंजन केले होते. मुग्धा वैश्यंपायन विशेष म्हणजे स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धक होती.

रियालिटी शोमधून अनेक गायक गायिका प्रसिद्धीच्या झोतात येतात. शोमधील कामगिरी म्हणा किंवा त्यांच्यातल्या टॅलेंटमुळे त्यांना गायनाच्या चित्रपटसृष्टीत ब-याच ऑफर मिळतात. मात्र काही हिट गाणी दिल्यानंतर हे गायक गायिका अचानक गायब होतात. सिनेमात त्यांच्या सूरांची जादू दिसत नाही. फार फार तर कॉन्सर्ट आणि शोमध्ये ते पाहायला मिळतात. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांना यश मिळाले आणि त्यांनी ते आजपर्यंत टिकवून ठेवले आहे.

 

मिळालेले यश टिकवून ठेवण्याचे कौशल्य गायिका मुग्धा वैशंपायनला जमलं. २००८ साली आलेल्या  लिटिल चॅम्सनी या रियालिटी शोने एक से बढकर एक स्पर्धकांमुळे रसिकांचे भरघोस मनोरंजन केले होते. आपल्या गायकीने सहभागी झालेल्या सगळ्याच स्पर्धकांनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. त्यांच्या आवाजानं लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं होतें.

या कार्यक्रमात सर्वाधिक लोकप्रिय झालेली स्पर्धक होती. मुग्धा वैश्यंपायन विशेष म्हणजे स्पर्धकांमध्ये सर्वात लहान ही स्पर्धक होती. इतक्या लहान वयात आपल्या सुरेल गायकीने तिने रसिकांची मनं जिंकली होती. मुग्धा आता मोठी झाली असून तिच्यात कमालीचा बदल झाला आहे. तिनं तिच्या गाण्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत केलं असून देश-विदेशात ती गाण्याचे कार्यक्रम करते.

मुग्धा इतरांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो ती चाहत्यांसह शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मुग्धा फार लोकप्रिय आहे. लिटिल चॅम्प' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचली मुग्धाची जादू आजही कायम आहे.आजही रसिक तिच्यावर तितकेच प्रेम करतात.

चिमुकली मुग्धा आता फार सुंदर दिसते.  तिला बघताक्षणी ओळखणेही अशक्यच इतका तिच्यात बदल झाला आहे. पण ही तिच चिमुकली मुग्धा आहे हे कळताच अनेकांना आश्चर्य वाटते. मुग्धा फार सुंदर दिसते.

 

मुग्धाने अनेक लोकप्रिय म्युझिक अल्बमसाठी गाणी गायली आहेत. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध गोष्टी करताना ती दिसेल. तसेच मुग्धाला साडी नेसण्याची फार आवड आहे. सोशल मीडियावर विविध अंदाजातले साडीमधले फोटो तिने शेअर केले आहेत.