'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Lagahte) ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एकमेकांप्रती असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून ही जोडी चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट चर्चिली जात आहे. यात मुग्धाची एक नवीन पोस्ट चर्चेत आली आहे. मुग्धा सध्या प्रथमेशपासून दूर असून त्याला चांगलंच मिस करत आहे.
सध्या मुग्धा पुण्यात एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली आहे. या पुणे दौऱ्यामध्ये ती क्षणोक्षणी प्रथमेशला मिस करत आहे. नुकतीच मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जेवणाचं ताट शेअर केलं आहे. सोबतच प्रथमेशची आठवण येत असल्याचं तिने म्हटलं आहे.
दरम्यान, 'मिस्ड यू प्रचंड…!' असं लिहित तिनं प्रथमेश लघाटे, बहीण मृदुला वैशंपायन आणि विश्वजीत जोगळेकर या मित्राला टॅग केलं. काही दिवसांपूर्वी 'आमचं ठरलंय' असं म्हणत या दोघांनी एकमेकांसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. यामध्येच अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलेली कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.