Join us

मृणाल दुसानिसने लेकीसोबत शेअर केला क्युट सेल्फी, फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:19 IST

Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस सध्या तिचे आईपण एन्जॉय करते आहे. नुकताच तिने नुर्वीसोबतचा सेल्फी शेअर केला आहे.

अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही माझीया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. मृणाल एका मुलीची आई असून तिचं नाव नुर्वी आहे. मृणाल सोशल मीडियावर बरीच सक्रीय असून ती नुर्वीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता मात्र मृणालने नुकताच गोंडस नुर्वीसोबत फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

मृणाल दुसानिस ही २४ मार्च २०२२ रोजी आई झाली. मृणाल सध्या तिचे आईपण एन्जॉय करते आहे. नुकताच तिने नुर्वीसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, सगळे कसे आहात? खूप कष्टांनी मी हा फोटो काढला. आमचा पहिला फोटो... त्यामुळे खूप खास आहे माझ्यासाठी...! मायलेकीचा टाइम. 

मृणाल दुसानिसच्या सेल्फीला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नुर्वी झाल्यापासून अनेकदा मृणालने तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

मृणालने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. नीरज अमेरिकेत राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच असते. 

टॅग्स :मृणाल दुसानीस