Join us

 कोरोनाची दहशत: गर्भातील बाळाच्या चिंतेने भावूक झाली ही अभिनेत्री, लिहिली इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 10:25 IST

गर्भातील बाळासाठी लिहिला खास मॅसेज

ठळक मुद्देइस प्यार को क्या नाम दूं, या मालिकेत ती अखेरची दिसली.

 टीव्ही अभिनेत्री स्मृती खन्ना सध्या प्रेग्नंट आहे.  प्रेग्नंसीचे 9 महिने पूर्ण झाले आहे. म्हणजेच स्मृती कधीही बाळाला जन्म देऊ शकते. पण तूर्तास कोराना व्हायरसचा वाढता आणि जगभर उद्भवलेली परिस्थिती पाहून स्मृती तिच्या येणा-या बाळाच्या काळजीने चिंतीत आहे. होय, स्मृतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली चिंता व्यक्त केली. आपल्या गर्भातील बाळासाठी तिने खास मॅसेजही लिहिला. सोबत एक सुंदर मिरर सेल्फी शेअर करत बेबी बम्प फ्लॉन्ट केला.

स्मृतीने लिहिले, ‘ डियर बेबी, काही दिवस आतच राहा. सध्या जगात विचित्र स्थिती आहे. भविष्यात काय होईल मला माहित नाही. पण मला माहितेय की, तू आधीच स्ट्राँग असशील आणि या जगात येशील. तू अशा जगात जन्माला येशील जिथे तुला नव्या पद्धतीने जगणे शिकावे लागेल आणि ही अजिबात वाईट गोष्ट नाही. सध्या प्रेग्नंट असलेल्या अन्य मातांबद्दलही मी विचार करतेय. कारण प्रेग्नंसी म्हणजे पूर्णपणे अनिश्चितता. यात रागही आलाच. पण लक्षात ठेवा, घाबरू नका. आपण सगळे सोबत आहोत़. आपण सगळे या संकटाला हरवू आणि आपल्या बाळांना एक चांगले आयुष्य देऊ...’

मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. प्रेग्नंसीच्या काळातील अनेक फोटो तिने शेअर केलेत.

2013 साली स्मृतीने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. इट्स कॉम्प्लिकेटेड या शोमध्ये ती दिसली होती. यानंतर मेरी आशिकी तुम से ही, नादांनियां, ये है आशिकी, सीआयडी, बालिका वधू अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली. इस प्यार को क्या नाम दूं, या मालिकेत ती अखेरची दिसली. 2017 मध्ये ही मालिका प्रसारित झाली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनकोरोना वायरस बातम्या