Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर लगेचच राधिका देणार ही गुड न्यूज? तिने स्वतः केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:24 IST

ऑनस्क्रीन रंगणा-या विवाह सोहळ्याची उत्सुकता रसिकांना लागली असताना अनिता म्हणजेच राधिकाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत ती एका चिमुकल्यासह खेळताना पाहायला मिळत आहे.

'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. लवकरच राधिका आणि सौमित्रचा लग्न सोहळा रसिकांना पाहयला मिळणार आहे. हा ऑनस्क्रीन रंगणा-या विवाह सोहळ्याची उत्सुकता रसिकांना लागली असताना अनिता म्हणजेच राधिकाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत ती एका चिमुकल्यासह खेळताना पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून सारेच संभ्रमात पडले आहेत. 

लग्नानंतर राधिका बाळाला जन्म देत असल्याचा गुड न्युज ट्रॅकही  मालिकेत पाहायला मिळणार की काय अशी चर्चासर्वत्र रंगत आहे. त्यात हा फोटो मालिकेच्या सेटवरचा असल्यामुळे राधिका मालिकेत बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा होत आहेत. या फोटोचे गुपित उलगडण्यासाठी थेट लोकमतने अनिताशी संवाद साधला त्यावेळी तिने या फोटोमागचे गुपित सांगितले आहे. हा फोटो जुना असून एक चिमुकला अचानक सेटवर आला होता. त्यावेळी हा फोटो क्लिक करण्यात आला होता. या फोटोचा आणि मालिकेचा कोणताही संबंध नाही. तर दुसरीकडे हा चिमुकला दिसायला हुबेहुब तैमूरसारखाच आहे. त्यामुळे या मुलाची तैमूरसह तुलना होत असल्याचे पाहायला मिळत आहे.   

तुर्तास राधिकाचे नववधू रूपातील फोटोंनाही सोशल मीडियावर तुफान पंसती मिळत आहे. या प्रत्येक फोटोमधील राधिकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. या सगळ्या फोटोंमध्ये राधिकाचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. खर खुरा वाटावा अशा शाही सोहळा मालिकेत रंगणार आहे. इतकेच नाहीतकर ऑनस्क्रीन रंगणा-या या सोहळ्याचा थाट हा वेगळाच आहे. लग्नसोहळ्यात राधिकाने घातलेले बाजूबंद, हार, कानातले, नथ, मांगटिका, तोडे या दागिन्यांची किंमत ५० लाख रुपये आहे. हे सर्व दागिने नकली नसून  अस्सल सोन्याचे आहेत.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोअनिता दाते