Join us

जमाई राजामध्ये मॉलीचा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 14:25 IST

कही किसी रोज, क्या हुआ तेरा वादा यांसारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री मॉली गांगुलीची जमाई राजा या मालिकेत लवकरच एंट्री ...

कही किसी रोज, क्या हुआ तेरा वादा यांसारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री मॉली गांगुलीची जमाई राजा या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. या मालिकेतील मॉलीची भूमिका ही खूपच वेगळी आहे. मॉली या मालिकेत पायल ही भूमिका साकारणार असून तिच्या या भूमिकेला काहीशी नकारात्मक छटा आहे. पायलने सेनगुप्ता कुटुंबियात प्रवेश करण्यामागे  काही कारणे आहेत. ही भूमिका साकारण्यासाठी मॉनी खूप उत्सुक आहे. अनेक वर्षांपासून मॉली मालिकेत काम करत असली तरी एक वेगळी भूमिका साकारण्याची तिची कित्येक महिन्यांपासून इच्छा होती. या भूमिकेमुळे तिची ही इच्छा पूर्ण झाली असल्याची ती सांगते.