Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."

By कोमल खांबे | Updated: June 21, 2025 17:47 IST

मराठी अभिनेता अजिंक्य राऊतने निर्मात्यांनी पैसे न दिल्याचं म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्यचे जवळपास ९ लाख रुपये हे निर्मात्यांकडे आहेत. व्हिडिओतून याचा खुलासा त्याने केला आहे. याशिवाय यावर काहीतरी ठोस नियम करण्याची गरज असल्याचंही त्याने म्हटलं आहे. 

मराठी कलाकार अनेकदा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. गेल्या काही महिन्यात काम करूनही पैसे न मिळाल्याबाबत अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली होती. आतादेखील मराठी अभिनेता अजिंक्य राऊतने निर्मात्यांनी पैसे न दिल्याचं म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्यचे जवळपास ९ लाख रुपये हे निर्मात्यांकडे आहेत. व्हिडिओतून याचा खुलासा त्याने केला आहे. याशिवाय यावर काहीतरी ठोस नियम करण्याची गरज असल्याचंही त्याने म्हटलं आहे. 

अजिंक्यने व्हिडिओतून पडद्यामागच्या इंडस्ट्रीची बाजू दाखवली आहे. तो म्हणतो, "कलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करणं, टिकून राहणं, बॅक टू बॅक कामं मिळवणं हे कठीण आहे. सुदैवाने जे लोक सातत्याने काम करत्यात त्यांचं कौतुक आहे. पण, ते कौतुक याच कारणासाठी आहे की...सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे कलाकार म्हणून काम मिळत नाहीये या कारणाने आत्महत्या केली, हे जेव्हा कानावर येतं तेव्हा जो काय जीव हळहळतो. आणि काम मिळत नसणं हे एक कारण आहेच. पण, ज्या लोकांनी काम मिळवून, मनापासून मेहनत करून, फॅमिलीपासून दूर राहून मोठ्या शहरांमध्ये मुंबईसारख्या शहरात येऊन स्वत:चं नाव बनवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली...माझं स्वत:चं उदाहरण द्यायचं झालं तर इंजिनियर असतानाही स्वच्छेने आणि आनंदाने या क्षेत्रात येऊन काम केल्यावर निर्माते जेव्हा पैसे देत नाहीत".

"माझे किती लाख रुपये अजून दिले नाहीत...जवळजवळ वर्ष झालंय मी अजून वाटच पाहतोय. माझे ९ लाख रुपयांहून अधिक पैसे यायचे बाकी आहेत. माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात आलेल्या व्यक्तीसाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्याने टोकाची भूमिका घेईपर्यंत त्याने आत्महत्या करेपर्यंत वाट पाहू नये. आणि माहिती नाही पण, यावर सरकार किंवा कमिटी कोणीतरी काहीतरी निर्णय आणावेत. कामं तर ते कोणाला आणून देऊ शकत नाही. पण, पैसे थकवून त्यांना पुढची कामं मिळावीत का, याबद्दल काहीतरी व्हावं. त्यांना कोणीही जाब विचारत नाही. त्यामुळे यावर ठोस निर्णय यावेत. काही सिनियर व्यक्ती असे काही निर्णय आणू पाहत आहेत. हा मेसेज प्रत्येक कलाकार, निर्मात्यापर्यंत पोहोचावा", असंही त्याने पुढे म्हटलं आहे.

पुढे अजिंक्य म्हणतो, "४ रुपये असतील, ४० हजार किंवा ४ लाख असू दे ती त्या कलाकाराची मेहनत आहे. यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी त्याचे पैसे द्यावे. काम नका देऊ पण मेहनत केलीय तर त्या लोकांचे पैसे तर द्या. आत्महत्या झाल्यावर हळहळ व्यक्त करत बसतात. आत्महत्या हा पर्याय नाही. आणि तो नसावाच. पण, प्रत्येकाची परिस्थिती ज्याला त्याला माहीत असते. पण, जे लोक आहेत त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना द्यावे हे मला नक्की वाटतं".  

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता