Join us

सारं काही तिच्यासाठी: नीरजसमोर येणार निशी-श्रीनूच्या लग्नाचं सत्य; मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 18:30 IST

Sara kahi tichyasathi: श्रीनूला कायमचं सोडून ओवी जाणार लंडनला

छोट्या पडद्यावर सध्या सारं काही तिच्यासाठी ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. दोन बहिणींची कथा सांगणारी ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत घरात मित्रासारखे वावरणारे निशी आणि श्रीनू यांचं लग्न घरातल्यांनी ठरवलं आहे. मुळात या दोघांनाही हे लग्न करायचं नाहीये. मात्र, घरातल्यांच्या आनंदासाठी ते लग्नाला तयार झाले आहेत. मात्र, आता खरं प्रेम मिळवण्यासाठी त्यांना प्रेमाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

निशी,नीरजच्या प्रेमात आहे. तर श्रीनू ओवीच्या प्रेमात. मात्र, कुटुंबियांनी निशी-श्रीनूचं लग्न ठरवल्यामुळे सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे निशी वडिलांच्या शब्दात अडकली आहे त्यामुळे तिला नीरजला कायमचं सोडावं लागणार आहे. तर, दुसरीकडे श्रीनू लग्नाला तयार झाल्यामुळे ओवी सुद्धा पुन्हा लंडनला जाण्याचा विचार करु लागली आहे. त्यामुळे कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे निशी-नीरज आणि ओवी-श्रीनू या दोन्ही जोड्यांना त्यांच्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

दरम्यान, नीरज लवकरच निशीला अंगठी देऊन लग्नाची मागणी घालणार आहे. पण, निशी नीरजला तिच्या ठरलेल्या लग्नाबद्दल सांगेल का? ओवी लंडनला जाणार असल्याचं श्रीनूला कळल्यानंतर तो तिला थांबवू शकेल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार