Join us

कांचनला उमगली तिची चूक; अरुंधतीसमोर हात जोडून मागणार माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:05 IST

Aai kuthe kay karte: आप्पांनी पुन्हा घरी यावं यासाठी अनिरुद्ध आणि कांचन प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता कांचन, अरुंधतीसमोर हात जोडून तिची माफी मागणार आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या एक मोठा ट्विस्ट आला आहे. कांचनने घरतल्यांसमोर आप्पांचा अपमान केला. त्यामुळे दुखावलेल्या आप्पांनी देशमुखांचा बंगला सोडला असून ते घराबाहेर पडले आहेत. मात्र, आता घरातील प्रत्येकालाच आप्पांची उणीव भासू लागली आहे. त्यामुळे आप्पांनी पुन्हा घरी यावं यासाठी अनिरुद्ध आणि कांचन प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता कांचन, अरुंधतीसमोर हात जोडून तिची माफी मागणार आहे. तसंच आप्पांना पुन्हा घरी घेऊन ये अशी विनंती करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्धला आप्पांची उणीव भासत आहे. त्यामुळे आप्पा माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे तो घरातल्यांना सांगतो. तसंच कांचनचं वागणं योग्य नव्हतं हेदेखील तो अप्रत्यक्षरित्या तिला सांगायचा प्रयत्न करतो. यानंतर कांचनला तिची चूक उमगली असून ती अरुंधतीची भेट घेते. आणि, काहीही कर पण आप्पांना पुन्हा घरी आण असं सांगते.

दरम्यान, कांचनची झालेली अवस्था पाहून आप्पा पुन्हा घरी येतील, असा शब्द अरुंधती कांचनला देते. त्यामुळे आता आप्पा झालेली घटना विसरुन कांचन आणि संजनाला माफ करतील का? ते पुन्हा घरी येतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार