Join us

मालिकेत पुन्हा होणार शेखरची रिएन्ट्री; पहिल्या नवऱ्याला पाहून संजनाला बसणार जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 15:04 IST

Aai kuthe kay karte:अरुंधतीला घटस्फोट दिल्यानंतर संजना आणि अनिरुद्ध यांचा नवा संसार सुरु झाला आहे. मात्र, अनिरुद्धचं या संसारातही मन रमत नसल्याचं दिसून येत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यानंतर अनेक रंजकदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे अरुंधती स्वबळावर तिची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. तर, अनिरुद्ध दरवेळेप्रमाणे तिचा पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच संजनाही त्याला साथ देत आहे. मात्र, आता या मालिकेत आणखी मोठा ट्विस्ट येणार आहे.

अरुंधतीला घटस्फोट दिल्यानंतर संजना आणि अनिरुद्ध यांचा नवा संसार सुरु झाला आहे. मात्र, अनिरुद्धचं या संसारातही मन रमत नसल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे, ,संजना वारंवार अरुंधतीला हरवण्याचा, तिला कमीपणा दाखवायचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. संजनाचा पहिला नवरा शेखर पुन्हा देशमुखांच्या घरी येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेखरची मालिकेत रिएन्ट्री झाली आहे. त्यामुळे संजनाचे धाबे दणाणले आहेत. इतकंच नाही तर शेखर अरुंधतीच्या बाजूने असल्यामुळे तो सातत्याने संजना आणि अनिरुद्ध यांना टोमणे मारत आहे. त्यामुळे शेखर परत का आला? त्याचा काही नवा प्लॅन तर नाही ना? असे अनेक प्रश्न संजनाला पडले आहेत. पण, शेखरला पाहून ती थोडी घाबरल्याचंही स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच शेखरच्या पुन्हा येण्याचं कारण काय? किंवा या मालिकेत आता कोणतं नवं वळण पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार