Join us

आई कुठे काय करते: ऑफिसमध्ये होणार अरुंधती-संजनाचं जोरदार भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:37 IST

Aai kuthe kay karte: आईवर ओझं नको म्हणून मुंबईमध्येच भाड्याने घर घेण्याचा विचार अरुंधती करते. परंतु, संजना चुकीचा अर्थ काढून अरुंधतीसोबत ऑफिसमध्ये वाद घालणार आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे सध्या ती डोंबिवलीमध्ये तिच्या आईकडे राहतीये. मात्र, आईवरही ओझं नको म्हणून मुंबईमध्येच भाड्याने घर घ्यावं अशी अरुंधतीची इच्छा आहे. तिच्या या विचारांना आशुतोषही साथ देताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्येच आता संजना चुकीचा अर्थ काढून अरुंधतीसोबत ऑफिसमध्ये वाद घालणार आहे. इतकंच नाही तर ऑफिसमध्ये ती सगळ्यांसमोर पुन्हा एकदा अरुंधतीला खोचकपणे प्रश्न विचारणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजना आणि अरुंधतीचे शाब्दिक वाद होताना दिसत आहेत. परंतु, नेहमीप्रमाणे अरुंधती संयमाने उत्तर देत संजनाला गप्प करते.

दरम्यान, अरुंधती मुंबईत भाड्याने घर घेण्यासाठी आशुतोषकडे मदत मागते. त्यांचं हे संभाषण सुरु असतानाच तिथे संजना आणि आशुतोषचा मित्र तेथे येतात. यावेळी आशुतोष त्याच्या मित्राला अरुंधतीसाठी घर शोधण्यास सांगतो. त्यावर आपल्या कंपनीचा 3BHK फ्लॅट असल्याचं तो सांगतो. विशेष म्हणजे या फ्लॅटचं कौतुक असल्यावर तुला या आलिशान फ्लॅटमध्ये रहायचं होतं म्हणून तू खोटं कारण काढून देशमुखांचं घर सोडलसं का असा संजना विचारते. यावरुन अरुंधती व संजनामध्ये वाद होतो. आता त्यांचा हा वाद कुठपर्यंत जातोय हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळेल.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार