Join us

आईच्या पावलावर पाऊल; धनश्री काडगांवकरच्या चिमुकल्या लेकानेही फॉलो केला ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:03 IST

Dhanashri kadgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'कच्चा बादाम' या गाण्यावर तिच्या लेकासोबत कबीरसोबत डान्स करतांना दिसत आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टींचा ट्रेंड व्हायरल होत असतो. यात खासकरुन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी गाणी ट्रेंड होत आहेत. विशेष म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत प्रत्येक जण हे ट्रेंड फॉलो करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच ट्रेंड अभिनेत्री धनश्री काडगांवकरने (dhanashri kadgaonkar) तिच्या चिमुकल्या कबीरसोबत फॉलो केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'कच्चा बादाम' या गाण्यावर तिच्या लेकासोबत कबीरसोबत डान्स करतांना दिसत आहे. धनश्री नाचत असतांना कबीरदेखील खळखळून हसत होता. थोडक्यात, तोदेखील आईसोबत या गाण्याचा आणि डान्सचा आनंद घेतोय असं दिसून येत होतं. तसंच या दोघांना धनश्रीच्या नवऱ्यानेही साथ दिली. तोदेखील अचानक आला आणि नाचू लागला.

दरम्यान, असंख्य मालिकांमध्ये झळकलेल्या धनश्रीला 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेत तिने नंदिनी म्हणजेच वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती. या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. त्यानंतर धनश्रीने तिच्या प्रेग्नंसी काळात कलाविश्वापासून काही काळ फारकत घेतली होती. मात्र, अलिकडेच ती 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली.  

टॅग्स :धनश्री काडगावकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन