Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:06 IST

निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 

सध्या सगळीकडेच लग्नाचा माहौल आहे. कलाविश्वातही लग्नाचे वारे वाहत आहेत. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. तर नुकतंच आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरही लग्नाच्या बेडीत अडकली. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 

'कन्यादान' फेम अभिनेता देवेश काळे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. देवेशने नुकतेचं प्री वेडिंग फोटोशूटचे फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. देवेशने समुद्रकिनारी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. "प्रवास तिथून सुरू होतो जिथे मन स्थिर होतं", असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. देवेशच्या होणाऱ्या पत्नीचं नाव सारिका असं आहे. सारिका एक सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. 

देवेशने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'प्रेम पॉयजन पंगा', 'मानसीचा चित्रकार तो', 'जय मल्हार', 'कन्यादान' या मालिकांमध्ये तो दिसला. तसेच 'पुष्पक विमान', 'बांबू' या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. देवेश आणि सारिका लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगटिव्ही कलाकारमराठी अभिनेता