Join us

"तेव्हा थांबण्याचा विचार केला...", मालिकेत खलनायिका साकारल्याने मराठी अभिनेत्रीला आलेला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:45 IST

"माझं लग्न ठरलं त्यावेळी...", खलनायिका साकारल्याने अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर झाला असा परिणाम, म्हणाली...

Neha Shitole: नेहा शितोळे (Neha Shitole) ही मराठी कलाविश्वाील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम लेखिका सुद्धा आहे. नेहा शितोळेने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मराठी मालिका, आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने साकारलेल्या खलनायिकांच्या भूमिका विशेष गाजल्या. सध्या नेहा शितोळे अशोक मा.मा. या मालिकेत काम करताना दिसत आहे. अशातच अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मालिकेत खलनायिकेच्या भूमिका साकारल्यामुळे लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो. याबद्दल तिने सांगितलं आहे.

नुकतीच नेहा शितोळेने 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या पॉडकास्टमध्ये  मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "मी सलग ४ ते ५ मालिकांमध्ये खलनायिका म्हणून केलं. त्यानंतर माझं असं की झालं की मग पुढे माझा विचार तसा व्हायला लागला. म्हणजे कोणी माझ्याविषयी कट करतंय का? कोणी दोन माणसं कोपऱ्यात बोलताना जरी दिसली तर ते माझ्याविषयी काही बोलत आहेत का? असा एक उगाच विचार यायचा. कारण आपण सतत वाईटच वागतोय लोकांसोबत, पण मला इतर वेळी कोणाशीच तसं वागायचं नाही. असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मी थोडं थांबण्याचा विचार केला."

यापुढे अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला किस्सा सांगत म्हणाली, "माझं लग्न ठरलं त्यावेळी माझ्या सासूबाई ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर होत्या. तिथे सगळ्या सेल्स गर्ल होत्या त्यांनी माझ्या सासूबाईंना असं सांगितलं होतं की, अहो! 'कुठल्या मुलीशी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न ठरवलं? कशी वागते ती? तुम्ही पाहिलं का तिला?'  यावर सासूबाईंचं उत्तर होतं की, 'हो मी बघितलंय तिला, ती नाही वागत तशी, किती गोड आहे ती मुलगी!' त्यांनी मला एक दिवस दुकानात बोलवलं होतं. मलाही नथ खरेदी करायची होती. तेव्हा मी त्या सगळ्यांशी बोलले. नचिकेतची त्यांना काळजी वाटत होती की हिच्याशी लग्न झाल्यावर त्याचं कसं होणार? पण त्यानंतर त्यांचं मत बदललं आणि 'फार गोड मुलगी आहे ती' असं त्यांनी मग सासूबाईंना सांगितलं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.

टॅग्स :नेहा शितोळेटेलिव्हिजनसेलिब्रिटी