Marathi Actress Sai Kalyankar: आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी एक भावनिक आणि शारीरिक गुंतवणूक असते. गरोदरपणात स्त्रीयांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण, याच काळात अनेक मानसिक आणि शारिरीक बदल होत असतात. कधीकधी कलाकार त्यांना आलेले अनुभव मनमोकळेपणाने शेअर करता. त्यात आता लोकप्रिय मराठी अभिनेत्री, 'कमळी' फेम सई कल्याणकरने तिच्या प्रेग्नंसीदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
'कमळी',' ठिपक्यांची रांगोळी' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई कल्याणकर खऱ्या आयुष्यात अलिकडेच आई झाली. अभिनेत्रीने १० मार्च २०२६ रोजी कन्यारत्न झालं आहे. अलिकडेच अभिनेत्री अमृता पवार, मोनिका दबाडे, सई कल्याणकर, कुंजिका काळविंट या अभिनेत्रींनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गरोदरपणातील प्रवासाबद्दल आणि पहिल्यांदाच अनुभव असलेल्या मातृत्वाबद्दल सांगितलं. यादरम्यान, सई म्हणाली,"नभा अगदीच दोन महिन्यांची आहे. आई झाल्याशिवाय तुम्हाला एका आईचं मन कळत नाही असं म्हणतात, ते खरं आहे. कारण, खूप गोष्टी जोपर्यंत आपण अनुभवत तोपर्यंत आपल्याला त्यामागच्या भावना समजत नाही. गरोदरपणातील दिवस छान गेले. आणि आता मला लगेच काम करण्याचा विचारही नव्हता. पण, चांगल्या निर्मिती संस्थेमुळे त्या गोष्टी जुळून आल्या. त्यामुळे मी सगळं आनंदाने अनुभवते आहे. यात मला नभादेखील खूप साथ देते. सध्या मी आईकडे राहते आहे. तर आई तिला खूप छान पद्धतीने सांभाळते."
यानंतर मग पुढे सई गरोदरपणातील अनुभव सांगत म्हणाली, मी हे मान्य करते की, सुरुवातीला मी खूप रडले. माझे पहिले १५ दिवस हे खूप वाईट होते. आपण नेहमी भविष्याचा विचार करतो की आता ही गोष्ट आहे तर मग पुढे कसं होणार? हे सगळं मला जमणार आहे का? या गोष्टींचं मला खूप टेन्शन आलं होतं. कारण, सुरुवातीला नभाची तब्येत खूप बिघडली. आता ती बरी आहे.पण, आपल्या शरीराचं कायं होतंय हा प्रश्नच नसतो आपल्या बाळाचं काय होत आहे, हाच विचार डोक्यात असतो.
१४ तास कळा सोसून सीझर झालं...
"मी कुंजिकाला खूप फोन करायचे. कारण, ती तीनच महिने माझ्या पुढे होती. आमच्या गरोदरपणातील अनुभव सारखाच होता. काही तास कळा सोसून सीझर झालं. मी
१४ तास आणि ती १२ तास. पण, शेवटी सी-सेक्शन करूयात असं ठरलं." असं अभिनेत्रीने सांगितलं.
Web Summary : Actress Sai Kalyankar reveals her difficult first 15 days of pregnancy. She worried about the baby's health and future, enduring a C-section after 14 hours of labor. Now, she embraces motherhood with joy.
Web Summary : अभिनेत्री सई कल्याणकर ने गर्भावस्था के पहले 15 दिनों के बारे में बताया। बच्चे के स्वास्थ्य और भविष्य को लेकर चिंतित थीं, 14 घंटे के प्रसव के बाद सी-सेक्शन हुआ। अब, वह खुशी से मातृत्व को अपना रही हैं।