Aai Ani Baba Retire Hot Aahte: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिकेने अलल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेत किल्लेदार कुटुंबाने प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. दरम्यान, सध्या ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच या मालिकेत यशवंत आणि शुभाच्या लहान मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने म्हणजेच आदिश वैद्यने मालिकेतून एक्झिट घेतली. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आपण मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मालिकेतून मकरंद किल्लेकर हे पात्र मालिकेतून गायब होणार का? असं प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु या मालिकेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत मकरंद किल्लेदारच्या भूमिकेसाठी एका लोकप्रिय अभिनेत्याची वर्णी लागली आहे. मकरंद किल्लेदारच्या भूमिकेत आदिश वैद्यच्या जागी पिंगा गं पोरी पिंगा फेम अभिनेता अमित रेखी दिसणार आहे. असं म्हटलं जात आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत अमितने देखील आता या बातम्यांना दुजोरा दिला आहे. मकरंद किल्लेदार आता आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत मला बघा. रोज दुपारी २,३० वाजता. फक्त स्टार प्रवाहवर... अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
दरम्यान, अभिनेता अमित रेखीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर गेली अनेक वर्षे तो मालिका, चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा', 'तुझं माझं जमतंय' , 'भाग्य दिले तू मला' यानंतर तो पुन्हा एकदा 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.