गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील रेल्वे स्टेशन्स, बस स्टॉप आणि गजबजलेल्या रस्त्यांवर एक तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाच्या हातात चक्क "बायको पाहिजे, आशीर्वाद असू द्या" असा मजकूर असलेला बोर्ड आहे. ऐन उन्हात हा तरुण जोडीदाराच्या शोधात फिरत असल्याचं पाहून मुंबईकर थक्क झाले. पण, हा तरुण नक्की कोण आहे आणि तो असं का करतोय? यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
भर उन्हात मुंबईच्या रस्त्यांवर पायपीट करणाऱ्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अनेकांना वाटलं की हा तरुण खरोखरच लग्नासाठी मुलगी शोधत आहे. मात्र, त्याच्या हातात असलेल्या त्या बोर्डाकडे बारकाईने पाहिल्यावर एक वेगळीच गोष्ट निदर्शनास आली आहे. तरुणाने हातात घेतलेल्या 'बायको पाहिजे'च्या बोर्डवर 'स्टार प्रवाह' वाहिनीचा लोगो स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नाही तर स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे, हा एक स्टंट असून आगामी नव्या मालिकेच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
नेटकऱ्यांच्या मते, स्टार प्रवाहवर लवकरच 'बाई तुझा आशीर्वाद' ही नवी मालिका भेटीला येत आहे. या मालिकेच्या हटके प्रमोशनसाठीच वाहिनीने हा 'बायको पाहिजे'चा फंडा वापरल्याचा अंदाज लावला जात आहे. चॅनेलने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, धनराजच्या या स्टंटने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
Web Summary : A man with a 'wife wanted' sign in Mumbai was promoting a new TV show. The stunt, with a 'Star Pravah' logo, went viral. It's believed to promote the upcoming series 'Bai Tuza Ashirwad'.
Web Summary : मुंबई में 'पत्नी चाहिए' का बोर्ड लेकर घूम रहा व्यक्ति एक टीवी शो का प्रमोशन कर रहा था। 'स्टार प्रवाह' के लोगो वाला यह स्टंट वायरल हो गया। माना जा रहा है कि यह आगामी धारावाहिक 'बाई तुझा आशीर्वाद' का प्रचार है।