Join us
Daily Top 2Weekly Top 5

'केसरी नंदन' मालिकेत ही मराठमोळी अभिनेत्री साकारतेय बिजलीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 18:30 IST

कलर्स वाहिनीवर केसरी नंदन ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत असून तिच्या पात्राचे नाव बिजली आहे.

ठळक मुद्देरेश्मा शिंदे साकारतेय बिजलीची भूमिका

कलर्स वाहिनीवर केसरी नंदन ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत असून तिच्या पात्राचे नाव बिजली आहे. या मालिकेच्या सेटवरील फोटो रेश्मा सोशल मीडियावर शेअर करीत असते.  स्त्रियांचं विश्व चूल आणि मूल इतकंच मर्यादित ठेवणाऱ्या समाजातली एका पेहलवानाची छोटी मुलगी केसरी एक भव्य स्वप्न पहाते आणि भविष्यात महिला कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळवत, ते स्वप्न सत्यात उतरवते. त्या मुलीचा संघर्ष ‘केसरीनंदन’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. केसरीची भूमिका चाहत तेवानी साकारीत आहे. 

रेश्मा शिंदेने केसरी नंदन मालिकेच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती चाहतसोबत मजामस्ती करताना दिसते आहे. 

केसरी नंदन मालिकेची कथा राजस्थानच्या धरतीवर घडणार असल्यामुळे रेश्माची वेशभूषा ही पारंपारिक राजस्थानी स्त्री प्रमाणे पाहायला मिळते आहे. काही दिवसांपू्र्वी रेश्माने सोशल मीडियावर सिनेमॅटोग्राफर निशी चंद्रा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. मात्र मी म्हणेन प्रत्येक सुंदर कलाकाराच्या मागे सुंदर दृष्टीकोन असणाऱ्या सिनेमॅटोग्राफरचा हात असतो. कॅमेऱ्याच्या मागे असणारा माणूस त्याच्या कॅमेऱ्यात प्रत्येक कलाकाराला सर्वोत्कृष्ट बनवतो.

रेश्माने लगोरी, नांदा सौख्य भरे व बंध रेशमाचे या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :केसरी नंदनकलर्स