Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही वेगळे झालो होतो, पण…", उषा नाडकर्णी वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:52 IST

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचं कुटुंब आणि नवऱ्याबद्दल भाष्य केलं आहे. वयाच्या ८०व्या वर्षीही त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा, सून आणि नात आहे. परंतु , त्यांनी स्वतंत्र आयुष्य जगण्याला प्राधान्य दिलं आहे. 

Usha Nadkarni: अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) मराठी सिनेइंडटस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. केवळ मराठीच नाहीतर हिंदीतही अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आजही वयाच्या ८० वर्षी त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. उषा नाडकर्णी या त्यांच्या दमदार अभिनयास स्पष्ट वक्तेपणासाठी देखील तितक्याच ओळखल्या जातात.या वयातही त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि नात एकत्र राहत नाहीत. उषा नाडकर्णी सांगतात की, त्यांनी 'स्वतंत्र जीवनशैली' स्वीकारली आहे.

दरम्यान, उषा नाडकर्णी कुठल्याही मुद्यावर त्या स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया देतात. नुकतीच त्यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आऊंनी पहिल्यांदाच त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. त्या म्हणाल्या, " आमच्या कुटुंबामध्ये आम्ही चार भावंड आणि आई-पप्पा होते. माझं लग्न झालं, त्यानंतर भावाचं आणि मग बहीणीचं झालं. धाकटा भाऊ पंच्च्याहत्तरमध्ये गेला. माझं लग्न झालं मी वेगळी गेली. मग काही कारणांनी आम्ही वेगळे होतो. म्हणजे मी एकटी राहत होते."

त्यानंतर उषा नाडकर्णींनी सांगितलं, "नवऱ्याचं आणि माझं असं झालं होतं. पण,नाडकर्णी परिवारात माझं कोणाशीही भांडण नाही. सगळ्यांच्या पार्ट्या, जेवणं मी माझ्या छोट्याश्या घरात केलेल्या आहेत. मी केलेलं जेवण सगळ्यांना आवडायचं. ते जर बोलत नाही तर मी कोणाकडे बोलायला जाणार नाही.माझा देव आणि मी. माझ्या घरची माणसं आहेत. माझा भाऊ, मुलगा, बहीण होते कायम माझ्याबरोबर होते."

वर्कफ्रंट

१९८६ मध्ये 'मुसाफिर' या चित्रपटातून उषा नाडकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्या 'प्रतिघात', 'नरसिंहा', 'लव्ह', 'वास्तव', 'आर...राजकुमार' आणि 'रुस्तम' यासारख्या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या. १९९४ मध्ये 'अनहोनी' या हॉरर शोमधून टीव्हीवर पदार्पण करणाऱ्या उषा ताईंना 'पवित्र रिश्ता' मधून खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी 'कुमकुम', 'कुछ इस तरह', 'कैसे मुझे तुम मिल गये'मध्येही काम केले. त्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता आणि ७७ व्या दिवशी त्या घराबाहेर पडल्या होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Usha Nadkarni opens up about her separated marital life.

Web Summary : Usha Nadkarni revealed she and her husband separated but maintained family ties. Despite living separately, she cooked for family gatherings. She remains active in film and television after debuting in 1986.
टॅग्स :उषा नाडकर्णीसेलिब्रिटी