Sharvari Lohakare: झी मराठी वाहिनीवर लवकरच 'तुला जपणार आहे' ही थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe) या मालिकेत आई आणि मुलीची कथा असून मुलीच्या रक्षणासाठी आई कुठल्या अग्निदिव्यांना सामोरी जाणार हे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. 'तुला जपणार आहे' मालिकेत अभिनेता नीरज गोस्वामीसह, प्रतीक्षा शिवणकर महिमा म्हात्रे, मिलिंद पाठक आणि निलेश रानडे, शर्वरी लोहकरे अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अभिनेत्री शर्वरी लोहकरे जवळपास ८ वर्षानंतर झी मराठी वाहिनीवर कमबॅक केलं आहे.
'या सुखांनो या' तसेच 'खुलता कळी खुलेना' यांसारख्या मालिकांच्या माध्यमातून शर्वरी लोहकरे झळकली आहे. अलिकडेच अभिनेत्रीसोनी मराठीच्या निवेदिता माझी ताई मालिकेत विरोधी भूमिकेत पाहायला मिळाली. त्यानंतर आता पुन्हा 'तुला जपणार आहे' या नव्या मालिकेद्वारे अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
नुकताच झी मराठी वाहिनीने 'तुला जपणार आहे' या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय. एकंदरीत या मल्टीस्टार मालिकेकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु ही मालिका केव्हापासून प्रसारित केली जाणार याबद्दल कोणतीही माहिती वाहिनीकडून देण्यात आलेली नाही.