Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठमोळ्या अभिनेत्रीचे झाले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 14:17 IST

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.

ठळक मुद्देशर्वरीने सोनी मराठी वाहिनीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संग्राम साळवी, अस्ताद काळे काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचे नुकतेच लग्न झाले आहे. 

अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीचे नुकतेच लग्न झाले असून तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शर्वरीने शेअर केलेल्या या लग्नांच्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शर्वरीचे लग्न 21 फेब्रुवारीला झाले आहे. पण आता तिने लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ही बातमी दिली आहे. लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे... असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. ​सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत.

शर्वरीने सोनी मराठी वाहिनीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. इन्स्टाग्रामच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत तिच्याविषयी फॅन्सना अपडेट देते. 

 

टॅग्स :टेलिव्हिजन