Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्मिष्ठा राऊतने दिली गुडन्यूज; म्हणाली, 'आमचं पहिलं बाळ...', सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 12:42 IST

शर्मिष्ठा लवकरच नवी इनिंग सुरु करत आहे.

मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दोन वर्षांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. कोरोना काळात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तेजस देसाईसोबत तिचे लग्न झाले. आता शर्मिष्ठाने चाहत्यांनी एक गुडन्यूज दिली आहे. शर्मिष्ठा लवकरच नवी इनिंग सुरु करत आहे. 'आमचं पहिलं बाळ..' अशी पोस्टही तिने लिहिली आहे.

शर्मिष्ठाच्या आयुष्याची नवी इनिंग अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची गुडन्यूज म्हणजे ती लवकरच निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत सर्वांनीच शर्मिष्ठाला कधी अभिनय करताना बघितलं आहे. कधी विनोदी, तर कधी खलनायकी भूमिकाही तिने साकारल्या आहेत. मात्र आता ती निर्माती म्हणून काम करण्यास सज्ज आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ती म्हणते, 'आमचं पहिल बाळ.." तुला शिकवेन चांगलाच धडा" .. आत्ता पर्यंत अभिनेत्री म्हणून प्रवास सुरुच आहे त्याच बरोबर निर्माती म्हणून नविन प्रवास मी आणि तेजसने सुरु केला.. आणि त्यात मोलाची साथ आम्हाला दिली आमच्या वर विश्वास ठेवला झी मराठी आणि मधुगंधा कुलकर्णी  ह्यांनी.. अभिनेत्री म्हणून माणूस म्हणून तुम्ही रासिक प्रेक्षकांनी कायम मला साथ दिली.. आता या पुढच्या नविन प्रवासासाठी तुमचे आशिर्वाद कायम आमच्या सोबत असू दे.''

शर्मिष्ठाच्या या पोस्टवर कलाकार आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नव्या इनिंगसाठी शर्मिष्ठाही खूप उत्सुक आहे. शर्मिष्ठा निर्मित करत असलेली मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा'झी मराठीवर लवकरच येत आहे. यामध्ये शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिकेची कथा फारच वेगळी दिसत असून प्रेक्षकही उत्सुक आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेताझी मराठी