Join us

हाताला सलाईन अन्...; 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:06 IST

हाताला सलाईन अन्...; 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, फोटो पाहून चाहते चिंतेत

Prapti Redkar Post: झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकर घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला नवीन ओळख मिळाली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने  तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या या मालिकेमुळे तिचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. परंतु, नुकतीच अभिनेत्रीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. तब्येत बिघडल्यामुळे प्राप्ती रेडकर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याबाबत सोशल मीडियावर तिने स्वत माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आहे. तिच्याबद्दलची ही बातमी कळताच चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्राप्तीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत.पहिल्या फोटोमध्ये तिच्या हाताला सलाईन लावली असून ती हॉस्पिटलमध्ये बेडवर बसल्याची पाहायला मिळते. त्यानंतर तिने आणखी फोटो पोस्ट केले आहेत. तर शेजारी नर्स दिसत आहेत. याशिवाय प्राप्तीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय, त्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. आता अभिनेत्री पूर्णपणे बरी आहे, अशी माहिती मिळत आहे. प्राप्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर हेल्थ अपडेट दिली आहे. "नमस्कार, सगळ्यांना हा माझा ४-५ दिवसांपूर्वीचा फोटो आहे. त्यावेळी मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हते, त्यामुळे काही पोस्ट करता आलं नाही. आता पूर्णपणे बरी आहे. " असं अभिनेत्रीने सांगितलं आहे. 

वर्कफ्रंट

दरम्यान, प्राप्ती रेडकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ती सावळ्याची जणू सावली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया