Join us

समृद्धी केळकरला पडली 'हिरामंडी'ची भुरळ; आलमजेबचा लूक केला कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:06 IST

Samruddhi kelkar: समृद्धीने 'एक बार देख लिजिए' या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.

संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansale) यांची 'हिरामंडी' (heeramandi)  ही वेबसीरिज अलिकडेच रिलीज झाली. मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजच्या माध्यमातून भन्साळींनी ओटीटीवर पदार्पण केलं. विशेष म्हणजे या सीरिजची आणि त्यातील भूमिकांची क्रेझ सध्या संपूर्ण कलाविश्वावर असल्याचं पाहायला मिळत आहे. यात मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर (samruddhi kelkar) हिला सुद्धा या सीरिजमधील गाण्यावर व्हिडीओ करण्याचा मोह आवरला नाही.

हिरामंडी ही सीरिज सध्या जितकी गाजतीये त्याच्यापेक्षा कैकपटीने त्यातील गाणी सुपरहिट ठरत आहेत. यात खासकरुन आलमजेब आणि बिब्बोजानवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यावर तर इंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींनी व्हिडीओ शेअर केले आहेत. यात समृद्धीने सुद्धा तिची हौस पूर्ण करुन घेतली आहे.

समृद्धीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने 'एकबार देख लिजिए' या आलमजेबवर चित्रीत झालेल्या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. विशेष म्हणजे समृद्धीने अगदी आलमजेबच्या जवळ जाणारा लूक केला आहे. सोबतच तिने सुंदर असे एक्स्प्रेशन्सदेखील दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या लूकची चर्चा होतीये.

दरम्यान, समृद्धी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.  त्यामुळे आज सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो.

टॅग्स :टेलिव्हिजनसंजय लीला भन्साळीवेबसीरिजटिव्ही कलाकार