Join us

बोल्ड अंदाजात परीच्या आईचा व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का तिचा 'हा' अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:48 IST

Prarthana Behere: प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.  या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. त्यामुळेच परी, नेहा, यश आणि समीर हे पात्र आज प्रत्येक प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणे वाटतात. त्यातच नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे तर आज अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात. यात अलिकडेच प्रार्थनाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थनाने अलिकडेच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. इतकंच नाही तर पहिल्यांदाच तिचा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरु आहे. 

दरम्यान, प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. यात तिचं सौंदर्य आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य यामुळे तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रार्थना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार