Join us

"आशिर्वाद पाठीशी राहू द्या...",प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:59 IST

Prajakta Mali : वाढदिवसाच्या दिवशी प्राजक्ताच्या मित्र परिवार तिच्या घरी पोहोचला आणि तिला सरप्राईज दिलं. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून कारकीर्दीची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. प्राजक्ताची रानबाजार वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. प्राजक्ताने ८ ऑगस्टला आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

वाढदिवसाच्या दिवशी प्राजक्ताच्या मित्र परिवार तिच्या घरी पोहोचला आणि तिला सरप्राईज दिलं. बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम, विकास पाटील, दिग्दर्शक प्रताप फड यांनी प्राजक्ताला बर्थ डेचं सरप्राईज दिलं. मित्रांची धम्माल प्राजक्तानं व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे.

 प्राजक्ताने लिहिले, ''मित्रांनी मेणबत्या न लावण्याचा आणि औक्षण करण्याचा हट्ट धरला, मलाही तो आवडला 🥰.) तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा रूपात खूप प्रेम मिळालं. #कृतज्ञ#खूपधन्यवाद असेच आशिर्वाद पाठीशी राहू द्यात. 😌.जास्तीत जास्त कॅाल्स , मेसेजेस् ना उत्तरं द्यायचा, social media tags ना उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तरी जे नजरचुकीनं राहीले त्यांनी माफी द्यावी व लोभ कायम ठेवावा 🙏. तुम्हां सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड चांगल्या कामाने करण्याचा प्रयत्न करेन.'' प्राजक्तानं पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार देखील मानलेत.

प्राजक्ता मूळची पुण्याची. ललित कला केंद्रात मी नृत्य विषयात एमए करत होते. त्यावेळी योगायोगाने डान्स ग्रुपमधील एका मुलाने मला पाहिलं आणि ‘तांदळा’ सिनेमात मला अगदी छोटीशी भूमिका मिळाली. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनेनंतर प्राजक्ता माळी हे नाव घराघरात पोहोचले. मालिकेतील अभिनेता ललित प्रभाकरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटी