Join us  

मृणाल कुलकर्णीचे लेक अन् सुनबाई जोमात; रोमॅण्टिक फोटो शेअर करत साजरा केला व्हॅलेंटाइन डे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:12 PM

Virajas kulkarni and shivani rangole: विराजस आणि शिवानी यांनी व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत एक छान फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटपैकी काही फोटो त्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी.  'अवंतिका', 'सोनपरी' अशा कितीतरी हिंदी-मराठी गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. केवळ मालिकाच नव्हे तर चित्रपट, नाटक यांच्या माध्यमातूनही त्यांनी त्यांच्यातील कलागुण प्रेक्षकांसमोर सादर केले. विशेष म्हणजे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा लेक विराजस कुलकर्णी यांनेदेखील मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. परंतु, विराजस अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. यात अलिकडेच त्याने गर्लफ्रेंड शिवानी रांगोळेसोबत एक खास फोटो शेअर केला आहे.

गेल्या कित्येक काळापासून विराजस अभिनेत्री शिवानी रांगोळेला डेट करत असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. अलिकडेच या दोघांचा साखरपुडादेखील पार पडला. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत त्यांच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त्यांनी व्हॅलेंटाइन डे निमित्त आणखी एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे.

विराजस आणि शिवानी यांनी व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत एक छान फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटपैकी काही फोटो त्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही जोडी गेल्या कित्येक काळापासून एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवानी 'बनमस्का', 'सांग तू आहेस ना', 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. तर, विराजस अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकही आहे. त्याने 'मिकी', 'डावीकडून चौथी बिल्डिंग', 'भंवर' या नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :शिवानी रांगोळेटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमृणाल कुलकर्णी