Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या मेघा घाडगेची हिंदी मालिकेत एन्ट्री, 'या' शोमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 12:45 IST

मेघाची हिंदी मालिकेत एन्ट्री झाली आहे. स्टार प्लसवरील नव्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठसकेबाज लावणीने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मेघा घाडगे. तिची अनेक गाणीही लोकप्रिय ठरली आहे. उत्तम नृत्यांगणा असलेली मेघा अभिनेत्रीदेखील आहे. याआधी काही सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना ती दिसली. आता मेघाची हिंदी मालिकेत एन्ट्री झाली आहे. 

स्टार प्लसवर 'माटी से बंधी डोर' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत मेघा घाडगे महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. मेघा घाडगेबरोबरच या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेही दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. ऋतुजा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. तर ऋतुजाबरोबर बिग बॉस फेम अंकित गुप्ता लीड रोलमध्ये दिसणार आहे. ही मालिका एका प्रादेशिक मालिकेचा रिमेक असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मेघा घाडगे लावणी डान्सर म्हणून लोकप्रिय आहे. गेल्या २० वर्षांपासून ती लावणी नृत्य करत आहे. तिने 2004 साली आलेल्या 'पछाडलेला' या गाजलेल्या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. काही मराठी सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. बिग बॉस मराठी 4मध्येही ती सहभागी झाली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्लस