Join us

'शुभ विवाह' फेम अभिनेत्रीने सोडली मालिका, लवकरच होणार आई; पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:02 IST

अभिनेत्री लवकरच आई होणार आहे, काही दिवसांपूर्वीच तिचं डोहाळजेवण झालं.

गेल्या काही दिवसात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही कलाकारांनीही मालिका सोडल्या.स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'शुभविवाह' सध्या रंजक वळणावर आहे. मधुरी देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. तर यातील सेकंड लीड अभिनेत्रीने मालिकेला रामराम केला आहे. सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर करत तिने सर्वांना आभार मानले आहेत. कोण आहे ती अभिनेत्री?

'शुभविवाह' मालिकेत पौर्णिमा पटवर्धनची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे कुंजिका काळविंट (Kunjika Kalwanit). काही दिवसांपूर्वीच कुंजिकाने गुडन्यूज दिली. कुंजिका लवकरच आई होणार आहे. तिचं नुकतंच डोहाळजेवण पार पडलं. आता तिने अभिनयातून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले, "पुन्हा भेटू तोवर...गेल्या तीन वर्षांपासून पौर्णिमा, पुन्नो माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग होती. माझी ही भूमिकेपलीकडची ओळख बनली  होती. आज पुन्नो म्हणून माझा शेवटचा दिवस होता हे कटू सत्य आहे. पण हा शेवट नाही तर जोवर पुन्हा सगळं जुळून येत नाही तोवर घेतलेला हा एक सुंदर ब्रेक आहे."

या खास शोची मी भाग झाले हे माझं भाग्यच आहे. आज निरोप घेताना माझं मन जड झालंय पण आभार, प्रेम, आणि आठवणींनी भरलं आहे जे मी कायम माझ्यासोबत ठेवेन."

कुंजिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तुझी आठवण येईल अशाही भावना व्यक्त केल्या आहेत. आता कुंजिकाच्या जागी नक्की कोणती अभिनेत्री येणार याची उत्सुकता आहे. की मालिकाच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशीही चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतास्टार प्रवाहटेलिव्हिजनटिव्ही कलाकार