Join us
Daily Top 2Weekly Top 5

KBC च्या पहिल्या विजेत्याची पत्नी आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, 'कमळी' मालिकेत करतेय काम, पतीबद्दल म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:42 IST

KBC च्या पहिल्या करोडपतीची पत्नी आहे ही अभिनेत्री, लोकप्रिय मालिकेत करतेय काम;म्हणाल्या...

Sarika Nawathe: 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) या शोचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. या शोचा पहिला विजेता ठरलेले हर्षवर्धन नवाथे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. वयाच्या २७ व्या वर्षी मुंबईचा मराठमोळा तरुण असलेल्या हर्षवर्धन नवाथे यांनी केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकले होते.हर्षवर्धन यांचे लग्न सारिका नीलाटकर यांच्याशी झाले आहे. सारिका या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.सारिका यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या त्या झी मराठीवरील कमळी मालिकेत काम करताना दिसत आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही नायिका एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.या मुलाखतीत त्यांनी पतीबद्दल भाष्य केलं आहे. 

अलिकडेच सारिका नवाथे यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना  पती हर्षवर्धन यांच्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर सारिका यांनी म्हटलं," हर्षवर्धन एका बहुचर्चित शोचे विजेते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या शोची लोकप्रियता ही केवळ महाराष्ट्रात नसून संपूर्ण देशभरात आहे. त्यामुळे अर्थात अनेकजण बहुचर्चित शोच्या पहिल्या विजेत्याची बायको म्हणूनही मला ओळखतात." 

त्यानंतर मग पुढे सारिका मनातील भावना व्यक्त करत म्हणाल्या,"कधी-कधी नक्कीच असं वाटतं की, माझी या पलीकडेही ओळख आहे. कारण, मी सुद्धा बरंच काम केलेलं आहे. पण, हर्षवर्धन यांचा मला निश्चितच अभिमान आहे. त्यामुळे मी या सगळ्या चर्चा लाइटली घेते. फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं, याकडे माझं लक्ष असतं."

सारिका यांनी आजवर मराठी चित्रपट, टीव्ही आणि रंगभूमीवर कार्यरत आहेत. 'चाणक्य', 'जास्वंदी' ही त्यांची नाटकं चांगली गाजली. शिवाय दुरदर्शनवरील 'गुलाम ए मुस्तफा' ही हिंदी मालिकेत त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'अजिंक्य'तसेच'पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर', 'एक डाव संसारा' या चित्रपटात सारिका यांनी काम केलं आहे. सध्या त्या कमळी मालिकेत नयनतारा ही भूमिका साकारत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : KBC Winner's Wife Sarika Nawathe: Actress and Proud Partner

Web Summary : Sarika Nawathe, actress in 'Kamali', is married to Harshvardhan Nawathe, the first KBC winner. She balances her acting career with pride in her husband's achievement, focusing on dedicated work despite being known as 'KBC winner's wife'.
टॅग्स :सारिका नीलत्करटेलिव्हिजनसेलिब्रिटी