Join us  

मन उडू उडू झालं: मालिका सोडण्याच्या निर्णयाविषयी हृताने दिलं स्पष्टीकरण; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 12:09 PM

Hruta durgule: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका हृताने अचानक सोडल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता या चर्चांवर हृताने मौन सोडलं आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर 'मन उडू उडू झालं' या मालिकेची आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे (hruta durgule) हिची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका हृताने अचानक सोडल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच हृताने ही मालिका सोडण्यामागे अनेक कारणं असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, आता या चर्चांवर हृताने मौन सोडलं आहे. इतकंच नाही तर, मालिका सोडण्याचा विचार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.

'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, अलिकडेच हृताने दिलेल्या मुलाखतीमध्ये 'मन उडू उडू झालं' ही मालिका सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहनही तिने प्रेक्षकांना केलं आहे.

काय म्हणाली हृता?

 “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी या मालिकेचे शूटिंग करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तसेच चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका”, असं हृताने म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हृता मालिकेच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. सेटवर असलेल्या अस्वच्छतेमुळे तिचं आणि निर्मात्यांचं भांडण झालं होतं. त्यामुळे हा वाद विकोपाला गेल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत होतं. इतकंच नाही तर, लग्नासाठी वा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने ब्रेक घेतल्याचंही म्हटलं जातं होतं. मात्र, या सगळ्या चर्चांना आता हृताने पूर्णविराम दिला आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन