मराठी अभिनेत्री गायत्री दातारचीही लगीनघाई सुरू आहे. पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी, अनुष्का पिंपुटकर यांच्यानंतर गायत्रीदेखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गायत्रीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली होती. पण, तिने तिच्या पार्टनरचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे गायत्रीचा होणारा नवरा कोण, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. आता गायत्रीने तिच्या आयुष्यातील हिरोची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
गायत्रीने प्रीवेडिंग फोटोशूट केलं आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओतून गायत्रीने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी गायत्रीने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती होणाऱ्या नवऱ्यासोबत बीचवर दिसत आहे. "माझ्या कायमच्या सांताला भेटा", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रीकांत चावरे असं आहे. श्रीकांत एक फोटोग्राफर आहे.
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'अबीर गुलाल' मालिकेत ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी' आणि 'चल भावा सिटीत' या रिएलिटी शोमध्ये गायत्रीने सहभाग घेतला होता.
Web Summary : Marathi actress Gayatri Datar, set to marry soon, revealed her fiancé, Shrikant Chaware, a photographer, in a pre-wedding video shared on Christmas. Datar previously acknowledged her relationship but kept her partner's identity private, sparking curiosity among fans. She is known for 'Tula Paahte Re'.
Web Summary : मराठी अभिनेत्री गायत्री दातार जल्द ही शादी के बंधन में बंधने वाली हैं। उन्होंने क्रिसमस पर एक प्री-वेडिंग वीडियो साझा करते हुए अपने मंगेतर श्रीकांत चावरे (एक फोटोग्राफर) का चेहरा दिखाया। दातार ने पहले अपने रिश्ते को स्वीकारा था, लेकिन अपने साथी की पहचान गुप्त रखी थी, जिससे प्रशंसकों में उत्सुकता थी। वह 'तुला पाहते रे' के लिए जानी जाती हैं।