Join us

Video: ये तेरी चाँद बालिया!! वहिनीसाहेबांनी बार्बी लूकमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:47 IST

Dhanashri Kadgaonkar: धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. ही मालिका संपून बरेच दिवस झाले. मात्र,या मालिकेची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमधून कमी झालेली नाही. त्यामुळे या मालिकेविषयी वा त्यातील कलाकारांविषयी कोणतीही नवी माहिती जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. या मालिकेत नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar). 

लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या धनश्रीने सध्या तिचा कलाविश्वातील वावर कमी केला आहे. या काळात ती तिचा जास्तीत जास्त वेळ बाळाला देत आहे. परंतु, या काळातही ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. जो पाहून नेटकरी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

 धनश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती बार्बी लूकमध्ये दिसत आहे. यावेळी तिने वेगवेगळ्या अंदाजात पोझ दिल्या असून या फोटोशूटच्या बँकग्राऊंडला 'ये तेरी चाँद बालियाँ' हे गाणं सुरु असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. धनश्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ती 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमात झळकली होती.

टॅग्स :धनश्री काडगावकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा