Join us

रस्त्यावर पाणीपुरी खाताना दिसल्या अश्विनी आणि शिल्पी, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:21 IST

Video : धनश्री आणि दीपाचा रस्त्यावर पानीपुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे झी वाहिनीवरील 'तू चाल पुढं'. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं. या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब चौधरीने पुनरागमन केलं होतं. 'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दीपाचा आज वाढदिवस आहे. दीपाच्या वाढदिवासानिमित्त अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने खास व्हिडिओ शेअर केला आहे. 

धनश्री 'तू चाल पुढं' मालिकेत शिल्पी हे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेत ती दीपाच्या नणंदेच्या भूमिकेत आहेत. ऑनस्क्रीनप्रमाणेच दीपा आणि धनश्रीचा ऑफस्क्रीन बाँडही चांगला आहे. धनश्रीने शेअर केलेल्या व्हिडिओतून याची खास झलक पाहायला मिळत आहे. धनश्रीने दीपाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या दोघीही पाणीपुरी खाताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

धनश्रीच्या या व्हिडिओवर दीपाने हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. या व्हिडिओवर दीपाच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, याआधी धनश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेब हे पात्र साकारुन ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने काही वेळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.  

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार