Join us

कोल्हापुरी स्वॅग! ट्रेंड फॉलो करत "ठुमक-ठुमक ..." गाण्यावर मराठी नायिकांनी धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:17 IST

'ठुमक-ठुमक जांदी ऐ माहिये दे नाल' गाण्यावर थिरकल्या मराठी नायिका, हावभावने वेधलं लक्ष

Amruta Dhongade Share Dance Video: सोशल मिडिया या माध्यमामुळे संपूर्ण जग अगदीच जवळ आलं आहे. या माध्यमाद्वारे अनेकजण माहितीपर, विनोदी किंवा मनोरंनात्मक व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धीझोतात आले आहेत. हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. रिल्सच्या या जमान्यात बऱ्याच गोष्टी ट्रेंडमध्ये येत असतात. अनेकजण हा ट्रेंड फॉलो करतात. सर्वसामान्यासह सेलिब्रिटी देखील यात मागे नाही. अशातच मागील काही इंटरनेटवर 'जुती मेरी' या गाण्याची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच लोकांनी या ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स, व्हिडीओ बनवले आहेत. त्यात मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींनी याच गाण्यावर बनवलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेतील अभिनेत्री अमृता धोंगडे आणि सोनाली पाटील यांनी जुती मेरी गाण्यातील ठुमक ठुमक या ओळींवर ठेका धरला आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स व्हिडीओ तुफान  व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील सुंदर सादरीकरण आणि हावभावाने या नायिकांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. कोल्हापूरी कोलॅब असं कॅप्शन देत अमृता धोंगडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर अमृता-सोनालीच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर  एका यूजरने कमेंट्स करत म्हटलंय, "कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि पांडरा रस्ता... तर आणखी एका चाहत्यांने प्रतिक्रिया देत लिहिलंय, भारी miss you dear love love n love... अशी कमेंट त्याने केली आहे. 'ठुमक-ठुमक जांदी ऐ माहिये दे नाल' हे गाणं लोकप्रिय गायिका नेहा भसीनने गायलं आहे. हे गाणं एका प्रसिद्ध लोकगीताचं व्हर्जन असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :अमृता धोंगडेटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ