Join us

हिरव्या साडीतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? आता बोल्डनेसने वेधून घेते सगळ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 17:04 IST

सध्या मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. 

सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे फोटो व्हायरल होत असतात. बॉलिवूडबरोबरच मराठी सेलिब्रिटींचे फोटोही व्हायरल होताना दिसतात.मध्यंतरी सेलिब्रिटींच्या लहानपणीच्या फोटोंचा ट्रेंड आला होता. सध्या मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. 

फोटोतील या अभिनेत्रीने फोटोसाठी पोझ दिल्याचं दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया हिंदळकर आहे. अक्षयाने आठवीत असतानाचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त अक्षयाने हिरव्या साडीतील हा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "सहावा दिवस शौर्य आणि ताकदीचं प्रतीक असलेल्या दुर्गेचा अवतार असलेल्या कत्यायानी देवीचा. आजचा रंग हिरवा. मी आठवीत असताना माझ्या शिक्षकांनी हा फोटो काढलेला आहे. 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' या गाण्यावर मी डान्स केला होता," असं कॅप्शन दिलं आहे. 

अक्षया ही टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने 'तुझ्या इश्काचा नादखुळा' आणि 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेत तिने काम केलं आहे. अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अक्षया तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. मादक अदांमधील हॉट फोटो शेअर करत ती चाहत्यांना घायाळ करत असते. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपट