Join us  

पुन्हा कर्तव्य आहे: मुंबई लोकलमध्ये अक्षयाला पाहताच चाहते झाले थक्क; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 3:20 PM

Akshaya hindalkar: 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदाळकर ही वसुंधरा ही मुख्य भूमिका साकारत आहे.

अलिकडेच छोट्या पडद्यावर पुन्हा कर्तव्य आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यातही या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी वसुंधरा हिची तर महिलावर्गात क्रेझ निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय नुकताच अभिनेत्री अक्षया हिंदाळकर हिला आला.

'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदाळकर ही वसुंधरा ही मुख्य भूमिका साकारत आहे. अलिकडेच तिने एका मुलाखतीमध्ये तिला आलेला चाहत्यांच्या अनुभवाविषयी भाष्य केलं. वसुंधराची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून चक्क रेल्वे प्रवासातही तिला तिचा महिला चाहतावर्ग भेटला. या भेटीचा भन्नाट किस्सा तिने सांगितला.

"मी नवी मुंबई मध्ये राहते आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी शक्यतो ट्रेनचा प्रवास करते. असाच अलिकडे मी ट्रेनने प्रवास करत होते आणि मला भूक लागली. त्यामुळे मी चेहऱ्यावरचा मास्क खाली केला. जसा मी मास्क खाली केला माझ्या समोर बसलेल्या बायकांनी मला बरोबर ओळखलं. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता", असं अक्षया म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्या बायकांनी मालिकेच्या प्रोमोची प्रशंसा केली. माझं कौतुक केलं. मुळात मी फार काम केलं नाही पण पुन्हा कर्तव्य आहेचा फक्त प्रोमो पाहून लोकांमध्ये मी लोकप्रिय झाले. मला आतापर्यंत इतकी ओळख मिळाली नव्हती जी झी मराठीच्या या मालिकेमुळे मला मिळाली. प्रेक्षकांकडून असा प्रतिसाद मिळत आहे तेव्हा काम करण्याची ऊर्जा ही अजून वाढली आहे.”

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी