Join us

ऐश्वर्या नारकरांनी टाकली हवालदाराच्या खिशात पेटती काडी?; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 17:53 IST

Aishwarya narkar: तुम्ही पाहिला का ऐश्वर्या यांचा हा मजेदार व्हिडीओ

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. दमदार अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर ऐश्वर्या यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कलाविश्वात सक्रीय असलेल्या ऐश्वर्या सोशल मीडियावरही कमालीच्या अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे बऱ्याचदा त्या काही मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक डायलॉग म्हटला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ प्रचंड मजेशीर असून अनेक जण त्यावर कमेंट करत आहेत.

'तुला वेड लागलंय का? हवालदाराच्या खिश्यात  पेटती काडी का टाकलीस?', ''दादा, हवालदाराने मला सांगितलं जर तुला जेलमध्ये जायचं नसेल तर माझा खिसा गरम कर. मग काय केलं..'', असं ऐश्वर्या या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

दरम्यान, त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सामान्यांसोबतच सेलिब्रिटीदेखील कमेंट करत आहे. ऐश्वर्या नारकर या बऱ्याचदा त्यांचे पती,अभिनेता अविनाश नारकर यांच्यासोबतही असे मजेदार व्हिडीओ किंवा डान्सचे रिल्स शेअर करत असतात. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी