Join us
Daily Top 2Weekly Top 5

विशाल निकमची 'सौंदर्या' अखेर समोर! 'अर्धांगिनी' म्हणत दाखवला चेहरा; चाहत्यांचा अंदाज ठरला खरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:25 IST

विशाल निकमची 'सौंदर्या' आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! 'अर्धांगिनी' म्हणत अभिनेत्याने फोटो केला शेअर

मराठी कलाविश्वातील 'चॉकलेट बॉय' आणि 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.  विशालने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांनी वर्तवलेला अंदाज अगदी खरा ठरला असून, विशालची ही 'सौंदर्या' दुसरी कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे. 

काही दिवसांपूर्वी विशालने "माझी सौंदर्या...", असं गोड कॅप्शन देत काही रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये त्याने तिचा चेहरा लपवून ठेवला होता. तेव्हापासूनच नेटकऱ्यांनी ती मुलगी अभिनेत्री अक्षया हिंदळकर असल्याचे तर्क लावले होते. अखेर विशालने अक्षयासोबतचा सुंदर व्हिडीओ पोस्ट करत तिला 'अर्धांगिनी' असं म्हटलंय. विशाल आणि अक्षयावर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

कोण आहे अक्षया हिंदळकर?अक्षया हिंदळकर ही मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'साता जल्माच्या गाठी' यांसारख्या मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे याच मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. विशाल आणि अक्षयाची जोडी सोशल मीडियावर प्रचंड पसंत केली जात आहे, दोघांवर चाहत्यांकडून आणि मराठी कलाविश्वातील कलाकारांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vishal Nikam reveals 'Saundarya': Actress Akshaya Hindalkar is his 'Ardhangini'.

Web Summary : Actor Vishal Nikam publicly announced his relationship with actress Akshaya Hindalkar, confirming fans' speculations. Nikam shared a romantic video, referring to Hindalkar as his 'Ardhangini,' sparking an outpouring of good wishes from fans and colleagues within the Marathi film industry.
टॅग्स :विशाल निकममराठी अभिनेता