रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमातील प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील पहिली झलक समोर आली आहे. रणबीरला रामच्या लूकमध्ये पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. 'रामायण' सिनेमाचा टीझर व्हायरल झाल्यानंतर मराठी अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनीही पोस्ट लिहिली आहे. स्वप्निल राजशेखर यांनी रणबीरला ट्रोल करणाऱ्यांसाठी खास संदेश दिला आहे. ते म्हणतात, "'रामायण’ या आगामी चित्रपटात ‘ॲनिमल’ मधली खुनशी, नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रभु श्रीराम यांची भुमिका दिल्याबद्दल आक्षेप व्यक्त होतोय…".
"तर, छ. शिवरायांची भुमिका करणाऱ्या अभिनेत्यांपैकी सर्वात उत्तम मानले जातात ज्येष्ठ अभिनेते स्व. चंद्रकांत मांडरे. (सध्या ते सोशल मिडीयावरसुध्दा चर्चेत आहेत, माहिती असेल.) त्याकाळी रजतपटावर सर्वात लोकप्रिय श्रीराम साकारणाऱ्या चंद्रकांत यानी एका सिनेमात (‘स्वयंवर झाले सीतेचे’मधे) रावणही केलाय.. ‘रम्य ही स्वर्गाहुन लंका’ गाणं युट्युबवर पहा… शिवाय खूप आधी १९४०च्या दशकात ‘जय मल्हार’ या सिनेमात एक अत्यंत उन्मत्त, स्त्रीलंपट, आणि नायिकेचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला आपल्या वाड्यावर कोंडुन ठेवणारा कडवट खलनायक अस्सल आणि उत्तम साकारलाय चंद्रकांतनी…सिनेमा गोल्डन ज्युबिली होता. (यातलाच तो उन्मादी खलनायक भविष्यात राजशेखर यानी पुढे नेला", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ते म्हणतात, "तस्मात ॲनिमल मधे खलनायकी भुमिका करणारा अभिनेता श्रीराम साकारुच शकतो. बाकी तो ती भूमिका कशी निभावेल ते सिनेमा पाहुन बोलुया…आत्ताच कशाला?!!! प्रेक्षक कौल देतीलच". त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. रणबीरचा 'रामायण' सिनेमा दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : Swapnil Rajshekhar defends Ranbir Kapoor's casting as Lord Ram in 'Ramayana' despite his 'Animal' role. He cites Chandrakant Mandare, who played Shivaji and Ravan, as an example. Rajshekhar urges audiences to judge Kapoor's performance after watching the film.
Web Summary : स्वप्निल राजशेखर ने 'एनिमल' में भूमिका के बावजूद रणबीर कपूर को 'रामायण' में भगवान राम के रूप में कास्ट करने का बचाव किया। उन्होंने शिवाजी और रावण की भूमिका निभाने वाले चंद्रकांत मांडरे का उदाहरण दिया। राजशेखर दर्शकों से फिल्म देखने के बाद कपूर के प्रदर्शन का आकलन करने का आग्रह करते हैं।