अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत तिने साकारलेली नेहा सर्वांना जाम आवडली. या मालिकेतील तिचा लग्न झाल्यानंतरचा लुकही प्रेक्षकांना प्रचंड आवडला. तिच्या साडीतील लुकवर चाहते फिदा आहेत. सोशल मीडियावरही प्रार्थना साडीतील एक ना अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोंवरही चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. पण नवरोबाचं काय? प्रार्थनाचा साडीतील लुक तिच्या नवरोबा आवडतो का?
‘लोकमत फिल्मी’ने नेमका हाच प्रश्न प्रार्थनाला केला आणि प्रार्थनाने दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हैराण झालेत. यावेळी प्रार्थनाने तिच्या हनिमूनचा धम्माल किस्साही शेअर केला.
प्रार्थना, तुझ्या या एकापेक्षा एक सुंदर अशा साड्यांच्या लुकवर नवरा काय कॉम्प्लीमेंट देतो? असा प्रश्न मुलाखतीत प्रार्थनाला केला गेला. यावर ती दिलखुलास हसली. ‘नो...नवऱ्याला माहिती पण नाही की मी रोज इतक्या साड्या नेसतेय की काय चाललंय आणि त्याला नाही आवडत...’असं ती म्हणाली. यानंतर तिने हनिमूनचा किस्साही शेअर केला.ती म्हणाली, मला आठवत लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा फिरायला गेलो होतो. तेव्हा जनरली असं असतं ना की, आपण लग्नानंतर दोन चार दिवसांनी फिरायला जातो तेव्हा हातांवर मेहंदी असते, बांगड्या असतात. तर आमचं लग्न झालं 14 नोव्हेंबरला झालं आणि आम्ही 1 डिसेंबरला फिरायला गेलो....आता असं का? तर याचं उत्तर तुम्हाला सोबत दिलेल्या व्हिडीओत मिळेल.
प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत 14 नोव्हेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली. डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. मिसिंग आॅन अ वीकेंड या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.