Join us  

Bigg boss marathi 3: '...म्हणून विशाल मागे पडतोय'; माधव देवचक्केने सांगितला विशालचा विक पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 6:06 PM

Madhav deochake: घरातील टास्कसोबतच स्पर्धकांचं वागणं आणि घरातील वावर यावरही प्रेक्षक त्यांची मत नोंदवत असतात. यावेळी अभिनेता आणि 'बिग बॉस २' चा माजी स्पर्धक माधव देवचक्के याने प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये 'बिग बॉस मराठी ३'च्या पर्वाची चर्चा आहे. या घरातील टास्कसोबतच स्पर्धकांचं वागणं आणि घरातील वावर यावरही प्रेक्षक त्यांची मत नोंदवत असतात. विशेष म्हणजे यावेळी अभिनेता आणि 'बिग बॉस २' चा माजी स्पर्धक माधव देवचक्के याने प्रतिक्रिया दिली आहे.

"मी ६३ दिवस बिग बॉस हाऊसमध्ये होतो. जवळपास दोन वर्ष झाली या गोष्टीला, परंतु मी बिग बॉसच्या घराला खूप मीस करतोय. खूप छान प्रवास होता. त्या घराची एक जादू म्हणजे माणसाचं आयुष्य बदलून जातं. मी स्वतःला नव्याने भेटलो. बिग बॉस हाऊसचं लोकेशन फिल्म सिटीला होतं. त्यामुळे त्या फिल्म सिटीतील सेटवरच्या खूप आठवणी आहेत. माझ्या अनेक मालिकांचे सेटस तिथे होते. त्यामुळे ती जागा माझ्यासाठी लकी आहे," असं माधव म्हणाला.पुढे तो म्हणतो, "आता जे ८ कंटेस्टंट राहिलेत ते सगळेच स्ट्रॉंग स्पर्धक आहेत. ते खूप जिद्दीने खेळत आहेत. विशाल निकमचं सांगायचं झालं तर तो समोरच्या टीमशी न भांडता स्वत:च्याच टीमशी जास्त भांडतो. आणि त्यामुळे तो कुठेतरी मागे पडतोय. विकास पाटील हा मास्टर माइंड वाटतो. आणि तो माझ्यामते टॉप ३ मध्ये असेल. मीनल शहा मला खूप लॉयल वाटते. सोनाली पाटील म्हणजे कोल्हापुरी ठसका. तिला जर तिची मत योग्यरित्या मांडता आली तर तिचा पुढील प्रवास सोप्पा होईल." 

"मीरा पहिल्या दिवसापासून मनोरंजन करते पण असं वाटतं ती टॉप ५ पर्यंत जाईल. जय दुधाणेबद्दल सांगायचं तर तो रिॲलीटी शो करून आलाय त्यामुळे त्याला माहिती आहे टास्क कसं खेळतात. परंतु लोकांना त्याचा स्वभाव रागिष्ट वाटतो. फक्त त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केलं तर तो पुढे जाईल. उत्कर्ष शिंदे मला टॉप ५ मध्ये असेल अस वाटतं. गायत्रीला या आठवड्यात हाताला लागलं असल्यामुळे तिला फिजीकली खेळता येत नाही आहे. आता बिग बॉसच्या घरात काय नविन खेळ होत आहेत हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल."

 दरम्यान,माधव देवचक्के सध्या त्याच्या 'विजेता' चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीमाधव देवचक्केटिव्ही कलाकार