Join us

आज तू जाऊन 2 वर्ष झालीत... मिस यू 'Buddy'..., खास मित्राच्या आठवणीत हार्दिक जोशीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:04 IST

Hardeek Joshi Post : नुकताच हार्दिकनं अभिनेत्री अक्षया देवधरसोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याची चांगलीच चर्चा झाली. आता मात्र हार्दिकने त्याच्या खास मित्रासोबतचा एक फोटो शेअर करत, एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या गाजलेल्या मालिकेतील राणादा अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi ) सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच हार्दिकनं अभिनेत्री अक्षया देवधरसोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याची चांगलीच चर्चा झाली. आता मात्र हार्दिकने त्याच्या खास मित्रासोबतचा एक फोटो शेअर करत, एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘मिस यू बडी, माझा भाऊ, माझा मस्तीखोर मुलगा, माझा मित्र, माझा सहकारी... तू जाऊन आज 2 वर्ष झालीत. पण तू आत्ताच आम्हाला सोडून गेल्यासारखं वाटतंय...,’अशी भावुक पोस्ट हार्दिकने शेअर केली आहे.

हार्दिकचा त्याला सोडून गेलेला हा मित्र, सखा, भाऊ दुसरा कुणी नसून त्याचा लाडका कुत्रा आहे.  आज त्याचा हा कुत्रा या जगात नाही. पण हार्दिक अद्यापही त्याला विसरू शकलेला नाही. ‘आय लव्ह यू बडी, मिसींग यू बॅडली,’ असंही हार्दिकनं लिहिलं आहे.  हार्दिकच्या या पोस्टवर अक्षया देवधरने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक व अक्षया देवधर दोघांनी एकत्र काम केलं होतं. हार्दिकनं राणादा साकारला होता तर अक्षयाने  पाठक बाईची भूमिका साकारली होती. दोघांची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आता राणादा व पाठकबाई ख-या आयुष्यात पती-पत्नी होणार  आहेत. ही आॅनस्क्रीन जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे.  अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. चाहते आता या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :हार्दिक जोशीटेलिव्हिजनअक्षया देवधर