मराठी टेलिव्हिजनवर एक मालिका तुफान गाजतीये आणि त्यातील अभिनेत्यावर तरुणी अक्षरश: फिदा आहेत. त्या अभिनेत्याचा लूक, चार्म, स्टायलिश अंदाज प्रेमात पाडणारा आहे. त्याचा हेअरकट, फॅशनही एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याला टक्कर देण्यासारखीच आहे. या अभिनेत्याची थेट शाहरुख खानशी तुलना होत आहे. या तुलनेवर पहिल्यांदाच त्यानेही नम्रपणे उत्तर दिलं आहे. कोण आहे तो अभिनेता?
स्टार प्रवाहवर सुरु असलेली मालिका 'तू ही रे माझा मितवा' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता अभिजीत आमकर सध्या चर्चेत आहे. महाविद्यालयीन मुलींचा तर तो क्रश आहे. त्याचा चार्मिंग लूक पाहून तरुणी अक्षरश: फिदा झाल्या आहेत. अभिजीतची तुलना अनेकदा शाहरुख खानशी होते. यावर नुकतंच त्याने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं. तो म्हणाला, "चाहते थेट शाहरुख खानशी माझी तुलना करतायेत हे बघून नक्कीच छान वाटतं. पण जेव्हा तुलना होते तेव्हा टीका आणि कौतुक असं दोन्हीही मिळतं. माझ्या एकंदर लूकमुळे लोकांना मी शाहरुखसारखा वाटतो हे मला माहितीये. यात माझं काहीच श्रेय नाहीये कारण हा माझा नॅचरल लूक आहे. मी कधीही हे बनायचं असं दिसायचं असा प्रयत्न केलेला नाही. मी फक्त प्रामाणिकपणे माझं काम करतोय आणि माझं स्वत:चं एक स्थान निर्माण करतोय. त्यामुळे मला याचं फार कौतुक वाटत नाही."
तो पुढे म्हणाला, "एकदा असंही झालं की ५०-५५ वयोगटातील लोक मला सांगतात की तुला बघून आम्हाला फौजीची आठवण झाली. तर ही खरी कॉम्प्लिमेंट वाटते. कारण ते मला त्या लेव्हलला बघतायेत हे मला खूप आवडतं. पण कधी कधी काही लोक असंही म्हणतात अरे हा तर सारखाच दिसतोय..सेमच आहे..याला मी काही करु शकत नाही. कारण मी तसं बनायचा प्रयत्नच करत नाहीये. शेवटी आपण आपलं काम करणं महत्वाचं असतं. आपण सगळेच शाहरुखचे चाहते आहोत यात शंका नाही पण मी कधी मुद्दामून तसं होण्याचा प्रयत्न केला नाही."
अभिजीत आगामी 'लग्नाचा शॉट' सिनेमात दिसणार आहे. तसंच तो याआधी 'टकाटक', 'एक सांगायचंय' या सिनेमांमध्ये दिसला आहे.
Web Summary : Abhijit Amkar, star of 'Tu Hi Re Maza Mitwa', is often compared to Shah Rukh Khan. He humbly acknowledges the comparison but emphasizes focusing on his work and natural look, not trying to imitate anyone. He appreciates being compared to 'Fauji'.
Web Summary : 'तू ही रे माझा मितवा' के अभिनेता अभिजीत आमकर की अक्सर शाहरुख खान से तुलना होती है। वे विनम्रतापूर्वक तुलना को स्वीकार करते हैं, लेकिन अपना ध्यान अपने काम और स्वाभाविक रूप पर केंद्रित रखते हैं, न कि किसी की नकल करने पर। उन्हें 'फौजी' से तुलना किए जाने की सराहना करते हैं।