Join us  

"ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा परफॉर्मन्स, तर श्रेया बुगडेबरोबर वळले लाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 7:34 PM

‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला.

मलायका अरोरा म्हणजे बॉलीवूडची स्टायलिश वूमन. सुंदर आणि हॉट अशी विशेषणं मलायकाच्या बाबतीत मात्र फिट बसतात. मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला आहे. या पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ या पुरस्कार सोहळ्याचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये मलायका अरोरा  "ऐका दाजीबा!" गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसली. तसेच श्रेया बुगडेबरोबर ती स्टेजवर लाडू वळताना पाहायला मिळाली. शिवाय तिचं मराठीही ऐकायला मिळालं. ती सलील कुलकर्णीकडे पाहून मराठीत म्हणते, “फक्त लड्डू देणार, पण मी नाही येणार हं”. प्रोमो व्हिडीओ पाहून संपुर्ण सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.  

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी कलाकार गेल्या बऱ्याच दिवसांपासून तयारी करत होते. लवकरच हा सोहळा प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहे. हा संपूर्ण पुरस्कार सोहळा प्रेक्षक 4 नोव्हेंबर पाहू शकणार आहेत.  

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटीझी मराठी