Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मलायकासोबत 'बापू जी'ने केला असा काही धमाल डान्स, बघून जेठालालने बंद केले डोळे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 12:42 IST

या आठवड्यात इंडियाज बेस्ट डान्सरच्या स्टेजवर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची टीम आली होती. या टीमने सेटवर चांगलीच मजा-मस्ती केली.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या डान्सने आणि खास अंदाजाने लोकांच्या मनात घर करण्यात काहीच कसर सोडली नाहीय. सध्या ती 'इंडियाज बेस्ट डान्सर' मध्ये जज म्हणून दिसते आहे. इथे केवळ जज म्हणून दिसते अस नाही तर धमाकेदार परफॉर्मन्सही देते. या आठवड्यात इंडियाज बेस्ट डान्सरच्या स्टेजवर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची टीम आली होती. या टीमने सेटवर चांगलीच मजा-मस्ती केली. या एपिसोडचे प्रोमोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात मलायका अरोरा 'बापूजी'सोबत डान्स करताना दिसत आहे.

इंडियाज बेस्ट डान्सरच्या मंचावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या टीमने चांगलीच धमाल केली. तेच 'बापू जी' मलायका अरोरासोबत 'अनारकली डिस्को चली' गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत. पण हैराण करणारी बाब ही आहे की, मलायका आणि बापू जी चा डान्स पाहून जेठालालने आपले डोळे बंद करून घेतले होते.   

केवळ बापू जीनेच नाही तर यावेळी मलायकासोबत जेठालाल आणि इतर कलाकारांनीही डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ इंडियाज बेस्ट डान्सरच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आता या एपिसोडबाबत शोचे फॅन चांगलेच उत्सुक झाले आहेत.

मलायका आरोराच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर सध्या ती केवळ इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये दिसते. त्याआधी ती इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल या शोची जज म्हणून दिसली होती. तशी मलायका आपल्या ग्लॅमरस लूकने आणि डान्सने नेहमीच चर्चेत राहते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. 

टॅग्स :मलायका अरोरातारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसोशल व्हायरल