Join us

VIDEO : मलायका अरोराची इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर वापसी, टेरेंसने असं केलं खास स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 09:59 IST

आता मलायका इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये परत आली असून इतर जजसोबतच स्पर्धकही तिचं स्वागत करत आहेत. टेरेंससोबतच स्पर्धकांनी डान्स परफॉर्मन्स करून मलायकाचं स्वागत केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने काही दिवसांपूर्वीच कोरोनाला मात दिली आणि इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये परतली. शोमध्ये तिचं जबरदस्त स्वागत करण्यात आलं आहे. कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर तिने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं होतं. आता ती परत आली असून इतर जजसोबतच स्पर्धकही तिचं स्वागत करत आहेत. टेरेंससोबतच स्पर्धकांनी डान्स परफॉर्मन्स करून मलायकाचं स्वागत केलं आहे.

टेरेंस कोरोना काळापासूनच फॅन्ससोबत जुळलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शोमधील मोमेंट्स तो नेहमी शेअर करत असतो. हॅशटॅग व्लॉगेश्वरीच्या माध्यमातून तो काही इंटरेस्टींग गोष्टी शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तो मलायका अरोराचं स्वागत करताना दिसत आहे. यात टेरेंस म्हणाला की, मी तुला खूप मिस केलं, पण मलायकाने त्याचा हा दावा धुडकावून लावला आणि म्हणाली की, तू खोटं बोलतोय. मला फक्त गीताने मिस केलं. (प्रियांका चोप्राच्या गाण्यावर मलायका अरोराचा BOLD डान्स, व्हिडीओ झालाय व्हायरल)

त्यानंतर व्लॉगेश्वरीमध्ये टेरेंसने स्पेशल गेस्ट इला अरूण यांचंही स्वागत केलं आणि काही इंग्रजी शब्दांचे हिंदी ट्रान्सलेशनही विचारले. मलायका शोमध्ये परत आल्याने स्पर्धक आनंदी आहेत. पण त्यांना याचंही दु:खं आहे की, नोरा फतेही शोमधून बाहेर गेली. काही दिवसातच तिने सर्वांनी मने जिंकली होती. आणि शोचा टीआरपी सुद्धा वाढला होता. दरम्यान, स्पर्धकांनी मलायकाच्या सुपरहिट गाण्यांवर डान्सही केला. ( VIDEO: कोरोनाला मात देताच पार्लरमध्ये पोहोचली मलायका, लोक म्हणाले - इथूनच झाला होता...)

दरम्यान, कोरोना व्हायरसला मात दिल्यानंतर मलायका अरोरा फार पॉझिटिव्ह बघायला मिळत आहे. तिने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सनकिस्ड फोटो शेअर केला होता. फोटोसोबत तिने पॉझिटिव्ह कॅप्शनही लिहिलं होतं. आता ती शोमध्ये पुन्हा आल्याने शोमध्ये रौनक आली आहे.  

टॅग्स :मलायका अरोराटेलिव्हिजन